Low Hemoglobin Symptoms : सतत थकवा आणि चक्कर येतेय? असू शकतो ॲनिमियाचा धोका; शरीरातील रक्ताचे प्रमाण ओळखण्यासाठी पहा ही लक्षणे

बाळकृष्ण मधाळे

शरीरात रक्त कमी आहे?

अनेकदा आरोग्याशी संबंधित काही समस्या उद्भवल्या तरी त्यांची लक्षणे इतकी साधी आणि सामान्य असतात की लोक त्याकडे दुर्लक्ष करतात. शरीरातील रक्ताची कमतरता ही अशीच एक गंभीर, पण दुर्लक्षित समस्या आहे.

What is Anemia and Blood Deficiency?

|

esakal

रक्ताची कमतरता म्हणजे काय?

जेव्हा शरीरात तांबड्या रक्तपेशींची संख्या कमी होते, तेव्हा ‘ॲनिमिया’ (रक्तक्षय) हा आजार निर्माण होतो. या पेशी फुफ्फुसांमधून ऑक्सिजन शरीराच्या प्रत्येक भागापर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वाचे काम करतात. त्यामुळे त्यांची कमतरता झाल्यास शरीरात विविध लक्षणे दिसू लागतात.

What is Anemia and Blood Deficiency?

|

esakal

१. सतत थकवा आणि अशक्तपणा

रक्ताची कमतरता असल्यास शरीराला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही, त्यामुळे वारंवार थकवा जाणवतो आणि अशक्तपणा येतो. मात्र, हा थकवा जास्त काम किंवा ताणामुळेही येऊ शकतो, हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

What is Anemia and Blood Deficiency?

|

esakal

२. डोकेदुखी आणि चक्कर येणे

मेंदूला योग्य प्रकारे कार्य करण्यासाठी ऑक्सिजनची आवश्यकता असते. रक्त कमी असल्यास हा पुरवठा घटतो, त्यामुळे डोकेदुखी आणि चक्कर येण्याचा त्रास होऊ शकतो.

What is Anemia and Blood Deficiency?

|

esakal

३. श्वास घेण्यास त्रास होणे

अचानक श्वास घेण्यात अडचण येणे हेही रक्ताच्या कमतरतेचे एक लक्षण असू शकते. विशेषतः चालताना किंवा थोड्याशा श्रमांनंतर हा त्रास वाढतो.

What is Anemia and Blood Deficiency?

|

esakal

४. हात-पाय थंड पडणे

रक्ताभिसरणावर परिणाम झाल्यामुळे हात आणि पाय नेहमीपेक्षा थंड वाटू शकतात. हे शरीरात रक्तपुरवठा कमी असल्याचे संकेत असू शकतात.

What is Anemia and Blood Deficiency?

|

esakal

५. त्वचा फिकट किंवा पिवळसर दिसणे

हिमोग्लोबिन हे रक्तातील महत्त्वाचे घटक आहे, जे त्वचेला नैसर्गिक लालसरपणा देते. त्याची कमतरता असल्यास त्वचा फिकट, निस्तेज किंवा पिवळसर दिसू शकते.

What is Anemia and Blood Deficiency?

|

esakal

डॉक्टरांचा सल्ला घ्या

वरील लक्षणे वारंवार दिसत असल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता वेळेत डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे. योग्य आहार आणि उपचारांमुळे रक्ताची कमतरता सहज भरून काढता येऊ शकते.

What is Anemia and Blood Deficiency?

|

esakal

Solkadhi Benefits : उन्हाळ्यात अमृतच! जेवणानंतर रोज फक्त 1 ग्लास 'सोलकढी' प्या; पित्त आणि ॲसिडिटी होईल कायमची छुमंतर

Solkadhi Benefits

|

esakal

येथे क्लिक करा...