Monika Shinde
अँजिओप्लास्टीनंतर फक्त ब्लॉकेज काढणं पुरेसं नाही, रक्तवाहिन्या आतून मजबूत करणंही तितकंच महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठी योग्य आहारच औषध आहे.
प्रक्रिया केलेले पदार्थ टाळा. घरगुती, नैसर्गिक, संपूर्ण अन्न खा भाजी, फळं, डाळी, आणि पौष्टिक धान्यं यांचा समावेश करा.
तूप, नारळ तेल आणि ऑलिव्ह ऑइल प्रमाणात वापरा. ट्रान्स फॅट्स, बेकरी पदार्थ आणि तळलेलं अन्न पूर्णपणे टाळा.
हळद, लसूण, आले, दालचिनी, बीटरूट, डाळिंब, पेरू आणि पालक शरीरातील सूज कमी करून हृदयाचं संरक्षण करतात.
उकडलेली अंडी, डाळी, कडधान्यं, पनीर, मासे (रोहु, सुरमई, साल्मन) किंवा फ्लॅक्ससीड हे पदार्थ पेशींची दुरुस्ती करतात.
साखर, बिस्किटे, ब्रेड, मैदा, कोल्डड्रिंक्स, ट्रान्स फॅट्स आणि प्रक्रिया केलेले स्नॅक्स हे हृदयावर ताण वाढवतात.
दररोज ३०–४० मिनिटं चालणं, ध्यान, दीर्घ श्वसन, आणि पुरेशी झोप हे हृदय पुनर्बांधणीसाठी औषधांइतकंच आवश्यक आहे.