पाय सुजतोय, दुखतोय? हे केवळ थकवा नसून 'या' गंभीर आजाराची लक्षणं असू शकतात

Monika Shinde

पायातील बदल

पायात सूज, वेदना किंवा उष्णता जाणवतेय का? हे केवळ थकव्याचे लक्षण नाही. काही वेळा हे शरीरात सुरू असलेल्या गंभीर आजाराचे सुरुवातीचे चिन्ह असू शकते.

रक्ताच्या गाठींचा धोका ओळखा

पायात तयार होणाऱ्या रक्ताच्या गाठींना डीप वेन थ्रॉम्बोसिस (DVT) म्हणतात. या गाठीमुळे रक्तप्रवाह अडतो आणि सूज, वेदना, लालसरपणा अशी लक्षणे दिसतात.

कॅन्सरशी असलेला गुप्त संबंध

तज्ज्ञांच्या मते, काही रुग्णांमध्ये DVT ही पॅनक्रियाटिक कॅन्सरची सुरुवातीची खूण असते. हा कॅन्सर रक्त गोठण्याची प्रक्रिया बिघडवतो, ज्यामुळे गाठी तयार होतात.

पायातील वेदना

एकाच पायात सतत वेदना, सूज आणि उष्णता जाणवत असल्यास हे केवळ थकवा नसून शरीराचा “धोका” देणारा सिग्नल असू शकतो. त्वरित तपासणी करा.

रक्ताची गाठ फुफ्फुसापर्यंत पोहोचतो?

कधी कधी गाठींचा भाग तुटून फुफ्फुसात पोहोचतो. त्यामुळे श्वास घ्यायला त्रास होणे, छातीत वेदना किंवा अचानक दम लागणे अशी गंभीर लक्षणे निर्माण होतात.

पॅनक्रियाटिक कॅन्सरची सुरुवातीची लक्षणं

त्वचा आणि डोळ्यांचा पिवळसरपणा, भूक कमी होणे, वजन घटणे, गडद लघवी, पांढरट मल आणि पोटदुखी ही सर्व लक्षणे दुर्लक्षित करू नका.

डॉक्टरांचा सल्ला का आवश्यक आहे?

अशा लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास आजार वाढतो. वेळेवर निदान झाल्यास कॅन्सरवर उपचार यशस्वी होऊ शकतात. तज्ज्ञांचा सल्ला घेणे हाच पहिला सुरक्षित टप्पा आहे.

थोडा विराम घ्या! मुंबई-पुण्याजवळची हिरवागार हिल स्टेशन मनाला शांती देतील

येथे क्लिक करा