Aarti Badade
रबडी आणि रसमलाईचा मिलाफ म्हणजे 'अंगूर रबडी'! घरच्या घरी कमी साहित्यात ही शाही मिठाई कशी बनवायची, ते पाहूया.
Angoor Rabdi Recipe
Sakal
१.५ लिटर फुल फॅट दूध, साखर, केशर, वेलची पावडर, सुका मेवा आणि छोटे पनीरचे गोळे (किंवा पेढे).
Angoor Rabdi Recipe
Sakal
एका जाड बुडाच्या पातेल्यात दूध गरम करा. मध्यम आचेवर दूध सतत ढवळत राहा, जोपर्यंत ते मूळ प्रमाणापेक्षा अर्धे किंवा १/३ होत नाही.
Angoor Rabdi Recipe
Sakal
दूध घट्ट झाल्यावर त्यात केशर (दुधात भिजवलेले), वेलची पावडर आणि चवीनुसार साखर घाला. साखर पूर्ण विरघळेपर्यंत ५-७ मिनिटे शिजवा.
Angoor Rabdi Recipe
Sakal
रबडी तयार झाल्यावर गॅस बंद करा. लक्षात ठेवा, रबडी थंड झाल्यावर आणखी घट्ट होते. त्यामुळे तिला पूर्णपणे रूम टेम्परेचरवर थंड होऊ द्या.
Angoor Rabdi Recipe
Sakal
तुम्ही घरी बनवलेले पनीरचे छोटे गोळे (साखरेच्या पाकातले) किंवा मऊ पेढ्यांचे छोटे गोळे वापरू शकता. हे 'अंगूर' आता थंड रबडीमध्ये मिक्स करा.
Angoor Rabdi Recipe
Sakal
तयार रबडीवर बारीक चिरलेले बदाम आणि पिस्त्याचे काप घालून सजवा. ही मिठाई थंडगार (Chilled) सर्व्ह केल्यास अधिक चविष्ट लागते.
Angoor Rabdi Recipe
Sakal
अशी ही रसरशीत आणि तोंडात विरघळणारी अंगूर रबडी नक्की ट्राय करा. पाहुण्यांच्या कौतुकासाठी ही परफेक्ट डिश आहे!
Angoor Rabdi Recipe
Sakal
Paneer Tikka Recipe
Sakal