Aarti Badade
पनीर टिक्का खायला कोणाला आवडत नाही? आता हॉटेलमध्ये जाण्याची गरज नाही, घरच्या घरी गॅसवरच बनवा चविष्ट आणि पौष्टिक पनीर टिक्का.
Paneer Tikka Recipe
Sakal
ताजे पनीर, हिरवी सिमला मिरची आणि कांदा. हे तिन्ही घटक मोठ्या चौकोनी तुकड्यांमध्ये (Cubes) कापून घ्या.
Paneer Tikka Recipe
Sakal
एका बाऊलमध्ये दही घ्या. त्यात लिंबाचा रस, आलं-लसूण पेस्ट, कसुरी मेथी, गरम मसाला, धना-जिरा पावडर, चाट मसाला आणि कश्मीरी लाल तिखट घालून नीट फेटून घ्या.
Paneer Tikka Recipe
Sakal
मॅरीनेशन घट्ट होण्यासाठी आणि पनीरला मसाला नीट चिटकून राहण्यासाठी त्यात २ चमचे भाजलेले बेसन आवर्जून घाला. यामुळे टिक्का कुरकुरीत होतो.
Paneer Tikka Recipe
Sakal
तयार मसाल्यात पनीर, कांदा आणि सिमला मिरचीचे तुकडे घालून हलक्या हाताने मिक्स करा. हे मिश्रण १५ ते २० मिनिटे बाजूला ठेवा जेणेकरून चव आतपर्यंत जाईल.
Paneer Tikka Recipe
Sakal
आता कबाब स्टिक किंवा ग्रिल स्टिक (Skewer) घेऊन त्यात पनीर, कांदा आणि सिमला मिरची एकामागे एक अशा क्रमाने लावून घ्या.
Paneer Tikka Recipe
Sakal
गॅसवर एक जाळी ठेवा. त्यावर या स्टिक्स ठेवून हाय फ्लेमवर बाजू पलटत छान शेकून घ्या. यामुळे टिक्का भाजल्यासारखा वाटेल आणि तंदूरी चव येईल.
Paneer Tikka Recipe
Sakal
तयार आहे तुमचा 'नो ऑईल' तंदूरी पनीर टिक्का! हिरवी चटणी, कांद्याचे स्लाईस आणि लिंबासोबत याचा आनंद घ्या.
Paneer Tikka Recipe
Sakal
Drumstick Soup Recipe
Sakal