Shubham Banubakode
निसर्गात अनेक जीवांची प्रजनन पद्धत वेगळी असते. काही जीव तर सुरुवातीला नर असतात आणि पुढे गरजेनुसार मादी बनतात.
animals that can change gender
esakal
क्लाउनफिश समूहातील मोठी मादी प्रमुख असते. तिचा मृत्यू झाल्यास सर्वात मोठा नर मादीमध्ये बदलतो आणि तिची जागा घेतो.
animals that can change gender
हा बदल समूहासाठी फायदेशीर ठरतो. नवीन मादी शोधण्याची गरज नसते आणि प्रजननाची प्रक्रियाही लगेच सुरू ठेवता येते.
animals that can change gender
हंप्ड श्रिम्प आधी नर असतो आणि पुढच्या वर्षी मादी बनतो. मोठं शरीर झाल्यावर मादी बनून तो हजारो अंडी देतो.
animals that can change gender
esakal
ब्लूहेड रॅसच्या समूहात प्रमुख नर नसल्यास मोठी मादी त्याची जागा घेते. तिचे अंडाशय बदलून प्रजननक्षम नराचे अवयव तयार होतात.
animals that can change gender
esakal
बियर्डेड ड्रॅगनमध्ये मात्र वेगळाच प्रकार दिसतो. अंड्याच्या विकासावेळी तापमान जास्त झाल्यास नर होणारे काही भ्रूण मादी म्हणून विकसित होऊ शकतात.
animals that can change gender
esakal
काही हिरव्या बेडकांमध्येही पर्यावरणाशी संबंधित परिस्थितींमुळे लिंग बदलण्याची प्रक्रिया आढळते. हा बदल केवळ प्रदूषणामुळेच होतो, असं नाही.
animals that can change gender
esakal
थोडक्यात, काही जीवांसाठी लिंगबदल ही निसर्गाने दिलेली खास युक्ती आहे. शरीराचा आकार, समूहव्यवस्था आणि पर्यावरण यामागे कारणीभूत ठरू शकतात.
animals that can change gender
esakal
Why did Shivaji Maharaj focus on fort gateways
esakal