सकाळ डिजिटल टीम
जगभरात सापांच्या 4 हजारांहून अधिक प्रजाती असून विषारी की बिनविषारी हे न कळल्याने साप दिसताच अनेकदा त्याला मारण्याचा प्रयत्न केला जातो.
Animals Immune to Snake Venom Besides Mongoose
sakal
मुंगुसाच्या नर्व्ह सेल रिसेप्टर्समधील बदल आणि अंगावरील दाट केसांमुळे सापाचे दात खोलवर जात नाहीत आणि विषाचा परिणाम होत नाही.
Animals Immune to Snake Venom Besides Mongoose
sakal
केवळ मुंगूसच नव्हे, तर निसर्गाने दिलेल्या खास शरीररचनेमुळे आणि प्रतिकारशक्तीमुळे इतर 5 प्राण्यांवरही सापाच्या विषाचा प्रभाव पडत नाही.
Animals Immune to Snake Venom Besides Mongoose
sakal
आफ्रिकेत आढळणाऱ्या हनी बॅजरची त्वचा अत्यंत जाड व सैल असते; त्यामुळे तो ब्लॅक मांबासारख्या विषारी सापांचीही शिकार करू शकतो.
Animals Immune to Snake Venom Besides Mongoose
sakal
आफ्रिकेतील सेक्रेटरी बर्ड हा पक्षी आपल्या लांब व भक्कम पायांनी सापाला चिरडतो आणि सापाच्या दंशाचा त्याच्यावर कोणताही परिणाम होत नाही.
Animals Immune to Snake Venom Besides Mongoose
sakal
उत्तर अमेरिकेतील बिनविषारी किंग स्नेकच्या शरीरात विषाविरुद्ध लढण्याची नैसर्गिक शक्ती असल्याने तो जहाल रॅटल स्नेकचीही सहज शिकार करतो.
Animals Immune to Snake Venom Besides Mongoose
sakal
धोकादायक सापांशी भिडणाऱ्या हेजहॉग या सस्तन प्राण्यामध्येही सापाच्या विषाचा सामना करण्याची नैसर्गिक प्रतिकारशक्ती असते.
Animals Immune to Snake Venom Besides Mongoose
sakal
ऑस्ट्रेलियातील परेंटी मॉनिटर ही मोठी पाल अत्यंत विषारी इनलँड टायपन सापाच्या पिलांची आणि लहान सापांची शिकार करते.
Animals Immune to Snake Venom Besides Mongoose
sakal
विशिष्ट रचना आणि जैविक प्रतिकारशक्तीमुळे हे प्राणी जहाल सापांचा सामना करूनही सुरक्षित राहतात, ही निसर्गाची मोठी किमया आहे.
Animals Immune to Snake Venom Besides Mongoose
sakal
खेकडा झाडावर चढून नारळ फोडू शकतो का?
Amazing Facts About Crabs
sakal