Mayur Ratnaparkhe
हिमाचलमधील मंडी येथे एका कुत्र्यामुळे ६७ ग्रामस्थांचा जीव वाचल्याचे समोर आले आहे.
कुत्र्याच्या भुंकण्यामुळे घरातील सदस्य रात्री उठले आणि घरात पाणी शिरत असल्याचे पाहून इतर नागरिकांना जागे सुरक्षितस्थळी पोहचले.
यावरून हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले की प्राण्यांना नैसर्गिक आपत्तीची आधीच जाणीव होते.
केवळ कुत्रेच नाही तर प्राणी, मासे, पक्षी आणि कीटक देखील सतर्क होतात आणि वेगळ्या पद्धतीने वागू लागतात.
कोणत्याही नैसर्गिक आपत्तीपूर्वी, कुत्रे विचित्र पद्धतीने भुंकू लागतात.
पक्ष्यांचा किलबिलाट देखील बदलतो आणि ते त्यांचे घरटे सोडून इकडे तिकडे उडू लागतात.
तर साप आणि उंदीर यांना सर्वातआधी भूकंपाची किंवा इतर कोणत्याही ओढावणाऱ्या नैसर्गिक आपत्तीची जाणीव होते.
त्यानंतर कुत्र्यांनाही जाणीव होते आणि म्हणूनच ते मोठमोठ्याने भुंकू लागतात.
प्राण्यांना कोणत्याही प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीची आगाऊ जाणीव होऊ शकते कारण ते पृथ्वीवरून येणाऱ्या लहरी आणि हालचाली ओळखतात.ं
प्राण्यांमध्ये अशा संवेदना असतात ज्या माणसांपेक्षा खूप जास्त सक्रिय असतात.