Anushka Tapshalkar
यशस्वी होण्यासाठी सहसा सकाळच्या सवयी महत्त्वाच्या असतात हे तर आपल्याला माहित आहे. पण संध्याकाळच्या वेळी जर आपण काही सवयी अवलंबल्या तर त्याचीही मदत आपल्याला यशाच्या शिखरावर पोचण्यासाठी नक्की होते. काय आहेत या सवयी जाणून घेऊया
धकाधकीच्या दिवसानंतर, पूर्ण दिवसात काय काय घडले याचा विचार करण्यासाठी संध्याकाळी काही वेळ काढा. याची तुमच्या व्यक्तिगत वाढीसाठी मदत होईल. तसेच दिवसाच्या शेवटी कृतज्ञता व्यक्त करायला विसरु नका.
दररोज दैनंदिनी लिहा आणि पुढ्याच्या दिवसासाठी एक टू- डू लिस्ट तयार करा. दुसऱ्या दिवसाची स्पष्ट उद्दिष्टे निश्चित असतील तर तुमचे मन एकाग्र राहते आणि सकाळी निर्णय घेतानाचा गोंधळ टळतो.
दिवसभराच्या थकव्यानंतर मोबाइलपासून दूर रहा. त्याऐवजी तुमचे छंद जोपासा, ज्यामुळे तुमचा दिवसभराचा थकवा दूर होईल व तुम्हाला आराम मिळेल.
बऱ्याच यशस्वी लोकांमध्ये एक सवय असते- ती म्हणजे रोजचे वाचन मग ते कामासाठी असो किंवा आनंदासाठी. यामुळे तुमचे जागतिक दृष्टिकोन वाढवण्यास तसेच,सामाजिक ज्ञानात भर घालण्यास मदत होते.
संध्याकाळच्या वेळी सगळे कुटुंब सदस्य घरात असतात. अशावेळी त्यांच्यासोबत गप्पा गोष्टी करा. यामुळे तुमचे जीवन आनंदी आणि परिपूर्ण होऊ शकते.
संध्याकाळी जड जेवण किंवा कॅफीन घेतल्याने एखाद्याचे पचन आणि झोपेच्या पद्धतींमध्ये व्यत्यय येऊ शकतो. त्याऐवजी चांगली झोप येण्यासाठी हलके जेवण किंवा हर्बल टीचा पर्याय निवडा.
झोपण्यापूर्वी ध्यान केल्यास एखाद्याला ताण कमी होणे, थकवा दूर होऊन शांत झोप लागण्यास मदत होते.
दररोज झोपण्याची वेळ निश्चित करा. त्याचे सातत्याने पालन केल्याने तुम्हाला शांत झोप लागण्यास मदत होईल.