सापांचा राजा असला तरी किंग कोब्रालाही भीती वाटते! ‘या’ 5 प्राण्यांपासून तो राहतो दूर

Aarti Badade

निसर्गाचे अजब चक्र

किंग कोब्रा हा जगातील सर्वात विषारी सापांपैकी एक आहे, एका दंशात हत्तीला मारण्याइतके विष असते. निसर्गाच्या अन्नसाखळीत या राजालाही घाबरवणारे काही शिकारी अस्तित्वात आहेत.

King Cobra enemies

|

Sakal

मुंगूस : नागाचा सर्वात कट्टर शत्रू

मुंगसाचा वेग इतका जास्त असतो की कोब्राला डंख मारण्याची संधीच मिळत नाही. महत्त्वाचे म्हणजे, मुंगसाच्या शरीरातील रिसेप्टर्स सापाच्या विषाला यशस्वीपणे रोखतात.

King Cobra enemies

|

Sakal

सेक्रेटरी बर्ड : साक्षात मृत्यू

आफ्रिकेत आढळणारा हा पक्षी आपल्या लांब पायांसाठी प्रसिद्ध आहे. हा पक्षी कोब्राच्या डोक्यावर इतक्या जोरात लाथ मारतो की सापाची कवटी एका फटक्यात फुटते.

King Cobra enemies

|

Sakal

मगर : पाण्याचा क्रूर राजा

जर कोब्रा चुकून पाण्याच्या साठ्याजवळ गेला आणि तिथे मगर असेल, तर त्याचा खेळ खल्लास समजा. मगरीची त्वचा इतकी जाड असते की सापाचे विषारी दात त्यात घुसूच शकत नाहीत.

King Cobra enemies

|

Sakal

हनी बॅजर : जगातील सर्वात निर्भीड

गिनीज बुकनुसार हनी बॅजर हा सर्वात शूर प्राणी आहे. सापाने चावा घेतला तरी हा प्राणी काही वेळ बेशुद्ध पडतो आणि पुन्हा उठून त्याच कोब्राला फस्त करतो.

King Cobra enemies

|

Sakal

गरुड आणि घार : आकाशातील संकट

जमिनीवर कोब्रा कितीही ताकदवान असला, तरी गरुडाच्या तीक्ष्ण नजरेतून तो वाचू शकत नाही. गरुड आपल्या मजबूत पंज्यांनी कोब्राला पकडून थेट आकाशात नेतो आणि हवेतच त्याचे तुकडे करतो.

King Cobra enemies

|

Sakal

शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ!

निसर्गाचा हा समतोल थक्क करणारा आहे. कोब्रा कितीही विषारी असला, तरी या शिकाऱ्यांकडे असलेली निसर्गदत्त वैशिष्ट्ये आणि चपळता कोब्राच्या विषावर नेहमीच वरचढ ठरते.

King Cobra enemies

|

Sakal

निसर्गाची अन्नसाखळी

वर नमूद केलेले प्राणी हे सिद्ध करतात की, सृष्टीच्या चक्रात प्रत्येक बलवान प्राण्याला रोखण्यासाठी निसर्गाने दुसरा एक सक्षम पर्याय निर्माण केला आहे.

King Cobra enemies

|

Sakal

कमी वयात श्रीमंत व्हायचंय? आचार्य चाणक्यांची ‘ही’ 4 सूत्रे नक्की फॉलो करा!

Chanakya Niti wealth tips

|

Sakal

येथे क्लिक करा