Pranali Kodre
कोकणातील दापोली तालुक्यात आंजर्ले गाव आहे. हे एक पर्यटन स्थळ असलं, तरी येथे फारशी गर्दी नसते.
Anjarle, Dapoli Tourism
Sakal
या गावातील गणपती मंदिर प्रसिद्ध आहे, ज्याला कड्यावरचा गणपती म्हणूनही ओळखले जाते. या मंदिराच्या टेकडीवरून अथांग समुद्रकिनारा दिसतो.
Anjarle, Dapoli Tourism
Sakal
या मंदिराची स्थापना १४३० च्या सुमारास झाल्याचे सांगण्यात येते. मूळ मंदिराच्या बाजूला शंकराचे लहान मंदिर आहे. मंदिरापर्यंत जाण्यासाठी गावातून रस्ता आहे.
Anjarle, Dapoli Tourism
Sakal
या मंदिराच्या पश्चिमेकडे रम्य समुद्रकिनारा, नारळी-सुपारीच्या बागांमध्ये हरवलेलं गाव आहे.
Anjarle, Dapoli Tourism
Sakal
आंजर्लेमधील समुद्रकिनारा शांत आणि नयनरम्य आहे. आजूबाजूला आलेल्या नारळी-सुपारीच्या बागांमुळे येथील सौंदर्य आणखीनच खुलून दिसतं.
Anjarle, Dapoli Tourism
Sakal
हा समुद्रकिनारा कमी गजबलेला असल्याने येथे एकांत मिळतो आणि छान निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवण्याचा आनंद घेता येतो.
Anjarle, Dapoli Tourism
Sakal
येथे पावसाचे प्रमाण अधिक असल्याने गर्दी आणखीच कमी होते. पण समुद्रात खेळताना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.
Anjarle, Dapoli Tourism
Sakal
येथे येण्यासाठी सप्टेंबर महिना उत्तम आहे, तसेच मे महिन्यात कोकणमेवा भरपूर उपलब्ध असतो. खवय्यांसाठी सी-फूडची मेजवानी असते.
Anjarle, Dapoli Tourism
Sakal
आंजर्लेला येण्यासाठी जवळचे रेल्वेस्थानक खेड आहे, तर आंजर्ले गावात बसस्थानक आहे.
Anjarle, Dapoli Tourism
Sakal
Aare Ware Beach, Ratnagiri
X/maha_tourism