सकाळ डिजिटल टीम
अंजीर आरोग्यासाठी फायदेशीर आहे, मात्र काही आरोग्याच्या समस्यांमध्ये त्याचे सेवन हानिकारक ठरू शकते. चला जाणून घेऊया, की कोणत्या परिस्थितींमध्ये अंजीर खाणे टाळावे.
अंजीराच्या बिया जड असतात आणि पचायला वेळ लागतो. ज्यांना यकृताशी संबंधित त्रास आहे, त्यांनी अंजीराचे सेवन करू नये.
सुकलेल्या अंजीरामध्ये सल्फाइट असते, जे मायग्रेन वाढवू शकते. मायग्रेनच्या रुग्णांनी विशेषतः हिवाळ्यात अंजीर खाणे टाळावेत, अन्यथा डोकेदुखी आणि थकवा वाढू शकतो.
अंजीराचा स्वभाव उष्ण असतो. त्यामुळे महिलांमध्ये रक्तस्राव जास्त होऊ शकतो, तसेच रेटिनल ब्लीडिंगसारखी समस्या उद्भवू शकते. शिवाय, मासिक पाळी अनियमित होण्याचा धोका देखील असतो.
जर तुम्हाला पोटदुखी, अतिसार किंवा अपचनाचा त्रास असेल, तर अंजीर खाऊ नये. अंजीर पोट अधिक जड करू शकतो आणि तुमची समस्या वाढवू शकतो.
अंजीरामध्ये ऑक्सलेट नावाचे घटक असते, जे मूत्रपिंडातील खड्यांची समस्या वाढवू शकते. ज्यांना किडनी स्टोन आहे, त्यांनी अंजीर खाणे टाळावे, अन्यथा परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते.
सर्वसाधारण निरोगी व्यक्तींनी देखील अंजीराचे अति सेवन करू नये. जास्त प्रमाणात खाल्ल्यास गॅस, अपचन आणि त्वचेच्या अॅलर्जी सारख्या समस्या होऊ शकतात. म्हणून ते मर्यादित प्रमाणातच खा.
प्रत्येक गोष्ट प्रत्येकासाठी योग्य असेलच असे नाही. अंजीर पोषणमूल्यांनी भरलेला असला तरी, जर तुम्हाला काही विशेष आरोग्य समस्या असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घेऊनच त्याचे सेवन करा.