Anuradha Vipat
हिंदी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय चेहरा असलेली अभिनेत्री अंकिता लोखंडे नेहमी चर्चेत असते.
आज अंकिता लोखंडेचा वाढदिवस आहे.
त्यानिमित्ताने अंकिताची सासू रंजना जैन यांनी खास सूनेसाठी पत्र लिहिलं आहे.
हे पत्र अंकिताने सोशल मीडियावर शेअर केलं आहे.
रंजना यांनी लिहिलं आहे की, “माझ्या लाडक्या सूनेला, तुझा हा वाढदिवस तू या कुटुंबासाठी घेऊन आलेल्या आनंद इतका आनंद घेऊन येवो.
पुढे रंजना यांनी लिहिलं आहे की,एका अशा सूनेला जी मुलीप्रमाणे आहे, तिला जगातील सर्व प्रेम मिळो. मला तुझी सासू असल्याचा खूप अभिमान आहे.
आमच्या संपूर्ण कुटुंबाकडून तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. तुझीच सासू असं रंजना यांनी लिहिलं आहे.