Anuradha Vipat
अतुल कुलकर्णींनी आतापर्यंत वेगळ्या भूमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.
आता एका मुलाखतीत १० वर्षांपासून मराठी सिनेमांपासून दूर का आहे याबाबत त्यांनी खुलासा केला आहे
या मुलाखतीत त्यांनी सांगितले की, १० वर्षे झाली मराठी सिनेमा केलेला नाही.
मराठी सिनेमांपासून लांब का आहे या प्रश्नाचे उत्तर देताना अतुल कुलकर्णी यांनी सांगितले, “मी लांब राहतोय, असं काही जाणूनबुजून करत नाहीये.
पुढे अतुल कुलकर्णी म्हणाले की, तशी स्क्रिप्ट आली नाही, तशी संधी आली नाही, हे त्याचं बेसिक होतं. एक ऑफर आली होती; पण ती माझ्या हातातून गेली.
अतुल कुलकर्णी नुकतेच ‘बंदीश बॅन्डिट्स’च्या दुसऱ्या पर्वातून प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत.
१२ डिसेंबरला ही वेब सीरिज अॅमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाली आहे.