Anuradha Vipat
अभिनेत्री अंकिता लोखंडेला आज कोणत्या ओळखीची गरज नाही.
छोट्या पडद्यावर स्वतःची ओळख निर्माण केल्यानंतर अंकिताने बॉलिवूडमध्ये देखील अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे
अंकिता तिच्या प्रोफेशनल आयुष्यापेक्षा जास्त खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते.
आता एका मुलाखतीत अंकिताने तिच्या पहिल्या मासिक पाळीबद्दल मोठा खुलासा केला आहे.
अंकिता म्हणाली की, ‘मला मासिक पाळीबद्दल फार जास्त काहीही माहिती नव्हतं, पण आई अनेक गोष्टी सांगायची त्यामुळे अनेक गोष्टी मला माहिती होतं
पुढे अंकिता म्हणाली की, ‘माझी पहिली मासिक पाळी आली तेव्हा मी बाथरुममध्ये गेली आणि रक्तस्त्रावर होत होतं. मला फार विचित्र वाटत होतं.
पुढे अंकिता म्हणाली की, ‘ बाथरुममध्ये मी कपडे काढले आणि तिथेच ठेवले. तेव्हा माझा भाऊ बाथरुममध्ये गेला त्याने माझे कपडे पाहिले, त्याला रक्त दिसलं. रक्त पाहिल्यानंतर अर्पण आईला जाऊन म्हणाला, मी आता मिंटीलाकधीच मारणार नाही, कारण तिचं निधन होणार आहे.