kimaya narayan
प्रेम रतन धन पायो हा सलमान खानचा सिनेमा खूप गाजला. 400 करोड रुपयांची कमाई या सिनेमाने केली आहे. या सिनेमात अंशिका भाटियाने सलमानच्या धाकट्या बहिणीची भूमिका साकारली होती.
अंशिका भाटियाने राजकुमारी राधिका ही भूमिका साकारली होती.
या सिनेमाने 400 करोड कमावले पण अंशिकाने ही फिल्म करताच बॉलिवूडमधील करिअरला रामराम केला.
2020 पासून ती बॉलिवूडपासून दूर आहे. एका सिनेमाच्या शूटदरम्यान तिच्या पायाला अपघात झाला. त्यानंतर तिने बॉलिवूडपासून ब्रेक घेतला.
अंशिकाने आतापर्यंत अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. परवरीश, हम तुम और देम, या मालिकांमध्ये काम केलं. कुछ रंग प्यार के ऐसे भी या मालिकांमधील तिची भूमिका गाजली.
गेली पाच वर्षं अंशिकाने कोणत्याही प्रोजेक्टमध्ये काम केलं नाहीये.
याशिवाय ती सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे. तिचे इंस्टाग्रामवर 6.4 मिलियन फॉलोअर्स आहेत.