संतोष कानडे
मुंग्यांबद्दल तुम्हाला हा माहिती नसेल. मुंग्या रहस्यमयी पद्धतीने आणि समूहाने जीव देतात.
मुंग्यांचा डेथ सर्कल हा एक विचित्र नैसर्गिक प्रकार आहे. याला Ant mill असे म्हणतात.
मुंग्या जेव्हा चालतात तेव्हा रासायनिक गंध सोडत चालतात, याच रसायनाचा वापर करुन मागच्या मुंग्या मार्ग धरतात.
कधी कधी त्याच मार्गात गोंधळ होतो आणि त्या मुंग्या गोल गोल फिरायला लागतात.
प्रत्येक मुंगीला वाटते की, ती योग्य मार्गावर आहे. परंतु त्यांना मार्ग सापडलेलाच नसतो.
त्यामुळे हजारो मुंग्या एकाच वर्तुळात फिरत राहतात. हा सर्कल तासन्तास किंवा कधी कधी दिवसांपर्यंत चालतो.
सतत चालल्यामुळे मुंग्या थकतात आणि अन्न-पाणी न मिळाल्याने अशक्त होतात. शेवटी त्या थकव्यामुळे मरतात.
हा प्रकार निसर्गातील एक दुर्मिळ पण धक्कादायक उदाहरण मानला जातो. अनेकांना हे माहिती नसेल.
निसर्ग हा अशाच धक्कादायक आणि गुढ गोंष्टींनी भारलेला आहे. आपण जेवढं खोल जाऊ तेवढं काहीतरी सापडतं.