संतोष कानडे
मुघलांचं मयूर सिंहासन हे भारतातील सर्वात अद्भुत वस्तूंमध्ये गणलं जात होतं.
तख्त-ए-ताऊस म्हणजे हेच प्रसिद्ध ‘मयूर सिंहासन’ मुघल साम्राज्याची शान होतं.
मयूर सिंहासह हे मौल्यवान रत्नांनी आणि सोन्याने सजलेलं होतं. त्यामुळे ते अधिक आकर्षक वाटे.
1739 मध्ये इराणचा सम्राट नादिरशहाने दिल्लीवर हल्ला करून हे सिंहासन लुटून नेलं.
लुटीच्या मालासोबतच त्याने मयूर सिंहासनदेखील इराणला नेलं. ते आजतागायत भारतात परतलच नाही.
इराणमध्ये गेल्यानंतर सिंहासनाचं मूळ स्वरूप टिकून राहिलं नाही.
1789 मध्ये आगा मुहम्मद शाहला हे सिंहासन तुटलेल्या अवस्थेत सापडलं होतं.
त्यातील रत्नांचा वापर करून नवीन सिंहासन बनवण्यात आल्याचं काही इतिहासकार सांगतात.
हे नवीन सिंहासन आज तेहरानच्या राजवाड्यात ठेवल्याचं सांगितलं जातं.
मुघलांचं मूळ मयूर सिंहासन आज अस्तित्वात नाही, पण त्याची कथा अजूनही जिवंत आहे.