संतोष कानडे
अतिशय किरकोळ जीव म्हणून आपण मुंग्यांकडे दुर्लक्ष करतो. पण मुंग्यांचंही एक इंटरेस्टिंग विश्व आहे.
मुंग्या चक्क शेती करतात. हो हे खरंय. तंत्रशुद्ध पद्धतीने मुंग्या शेती करतात. सर्वच मुंग्या शेती करीत नाहीत.
काही मुंग्या बुरशी (Fungus) पिकवतात. त्यासाठी त्या पाने गोळा करून बुरशी वाढवतात आणि नंतर ती खातात.
अशा पद्धतीने शेती करणाऱ्या मुंग्यांना 'लीफ-कटर अॅंट्स' असं म्हणतात. या मुंग्या शेतीत, जंगलात आढळतात.
मुंगी एक असा जीव आहे जो पृथ्वीवरच्या सर्व खंडांवर आढळतो. अपवाद मात्र अंटार्क्टिकाचा आहे.
मुंग्यांचा इतिहास तसा जुनाच आहे, १० कोटी वर्षांपूर्वीही पृथ्वीवर मुंग्या होत्या.
डायनासोरच्या काळातही पृथ्वीवर मुंग्या होत्या, असं तज्ज्ञ सांगतात. या मुंग्यांच्या अनेक जाती आहेत.
प्रत्येक मुंगीचं वैशिष्ट्य अत्यंत वेगळं आणि कामगिरीही नाना तऱ्हेच्या आहेत.