संतोष कानडे
राज्यातल्या अनेक भागांमध्ये बिबट्यांचा सुळसुळाट उठला आहे.
बिबटे माणसांवर हल्ला करुन जीव घेत आहेत. जनावरांचाही फाडशा पाडत आहेत.
हा जसा जमिनीवरचा बिबट्या आहे, तसाच समुद्रामध्येही एक बिबट्या असतो.
समुद्री बिबट्याला इंग्रजीत Leopard Seal असं म्हणतात. हादेखील अत्यंत क्रूर असतो.
हे समुद्री बिबटे पेंग्विनला उचलून घेऊन जातात आणि त्यांच्यावर अत्याचार करतात.
हे केवळ जबरदस्तीवर थांबत नाहीत, तर पेंग्विनची शिकारदेखील करतात.
जमिनीवरच्या बिबट्यांप्रमाणेच हे समुद्री बिबटे हल्ला करुन शिकार करतात.
Leopard Seal हा समुद्रामधला अत्यंत क्रूर शिकारी असून इतर जीव त्याच्यापासून सावध असतात.