संतोष कानडे
ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटले, पण हे खरं आहे. पुराच्या पाण्यामध्ये मुंग्या बुडत नाहीत. याचं कारण आहे संघटन कौशल्य.
मुंग्या नेहमी टोळीने कॉलनी करुन राहतात. एका कॉलनीमध्ये लाखो मुंग्या असू शकतात.
पूर आला तर मुंग्या एकमेकांना चिकटून 'जिवंत बोट' तयार करतात. त्यामुळे हजारो मुंग्या पाण्यावर तरंगू शकतात.
मुंग्या त्यांच्या वजनाच्या सुमारे ५० पट जड वस्तू उचलू शकतात. म्हणजे माणसाला तशी ताकद असती तर तो सहज कार उचलू शकला असता.
मुंग्यांच्या संवादाचं साधन फेरोमोन नावाचं रसायन आहे. या रसायनाच्या सुगंधाने त्या एकमेकींशी संवाद साधतात.
अन्नाचा साठा सापडला की त्या रस्त्यावर मुंग्या सुगंध सोडतात, त्यामुळे इतर मुंग्या त्यामागे येतात.
मुंग्यांचा इतिहास फारच जुना आहे. १० कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवर मुंग्या होत्या. डायनासोरच्या काळामध्ये मुंग्या अस्तित्वात होत्या.
पृथ्वीवर जवळपास सर्वच खंडांवर मुंग्या आढळतात, अपवाद फक्त अंटार्क्टिकाचा आहे. तिथे मुंग्या नाहीत.
मुंग्या अतिशय शिस्तशीर आणि नीतीने वागणाऱ्या कीटक आहेत. प्रत्येक गोष्ट त्यांनी सुनियोजित केलेली असते.