संतोष कानडे
सध्या सोशल मीडियात नरक्या वनस्पतीबद्दल व्हिडीओ व्हायरल होत आहेत. ही वनस्पती कॅन्सर बरा करते, असा दावा केला जातो.
नरक्या किंवा नारक्या ही पश्चिम घाटात आढळणारी दुर्मीळ औषधी वनस्पती आहे. हिचं शास्त्रीय नाव Nothapodytes nimmoniana (जुनं नाव Mappia foetida) आहे.
नारक्या हा मध्यम आकाराचा वृक्ष असून त्याची उंची साधारण 3 ते 8 मीटरपर्यंत वाढते. या वनस्पतीची साल करडी आणि गुळगुळीत असते.
नरक्याची पानं पाने चिवट आणि गर्द हिरवी कडकसर असतात. तर फुले लहान, पिवळसर-पांढरी असून त्यांना दुर्गंधी येते. याची फळे अंडाकृती व निळसर-काळपट रंगाची दिसतात.
नरक्या वनस्पतीतून Camptothecin (CPT) नावाचा महत्त्वाचा घटक मिळतो, असं सांगितलं जातं. हा घटक कर्करोगावरील औषधांच्या निर्मितीसाठी वापरला जातो.
टोपोटेकन आणि इरिनोटेकन सारखी औषधे तयार करण्यासाठी याचा उपयोग होतो. यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर या झाडाची मोठी मागणी आहे.
ही वनस्पती कायद्याच्या कक्षेत असून पाने, फुले तोडल्यात तस्करीचा गुन्हा दाखल होतो. महाराष्ट्रातील सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये ही झाडे आढळतात.
जास्त मागणीमुळे या झाडाची अवैध तस्करी केली जाते. त्यामुळे ही वनस्पती धोक्यातील प्रजातींमध्ये (Endangered Species) गणली जाते.
ही माहिती मिडिया रिपोर्ट्स आणि सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. प्रत्येकाने आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने उपयोग करावा