Anuradha Vipat
अनुराग कश्यपच्या घरी सध्या लगीनघाई सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे.
अनुरागची लाडकी लेक आलिया कश्यप येत्या काही दिवसांत विवाहबंधनात अडकणार आहे.
या सोहळ्याची खास झलक अनुरागने आपल्या सोशल मीडियावर शेअर केली आहे.
आलिया कश्यप नेहमीच तिच्या हटके आणि बोल्ड स्टाइलमुळे चर्चेत असते.
गेल्या काही दिवसांपासून आलिया कश्यप तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे.
२०२३ मध्ये वयाच्या २२ व्या वर्षी आलियाने बॉयफ्रेंड शेन ग्रेगोयरशी साखरपुडा केला होता.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, आलिया कश्यपचा विवाहसोहळा ११ डिसेंबरला मुंबई येथील महालक्ष्मी रेसकोर्समध्ये पार पडणार आहे.