Anuradha Vipat
अनेक हिंदी मालिकांतून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा अभिनेता म्हणजे गश्मीर महाजनी
आता मात्र गश्मीर महाजनी हा एका मुलाखतीत केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत आहे.
मुलाखतीत गश्मीर महाजनी म्हणाला की, तुमचं कुटुंब तुम्हाला भावनिक स्थैर्यता देते.
पुढे गश्मीर महाजनी म्हणाला की, माझं जे सगळं सकारात्मक वाटतंय तसा सतत प्रवास सकारात्मक नाही झाला.
पुढे गश्मीर महाजनी म्हणाला की,मी १५ ते १७ या काळात काम केलं असेल, पण १७ ते १८, १९ चा काळ होता जेव्हा मी प्रचंड नैराश्यात होतो.
पुढे गश्मीर महाजनी म्हणाला की, मग परत मी सात-आठ वर्ष खूप चांगलं काम केलं. मग २४ ते २८ या चार वर्षांत मी प्रचंड नैराश्यात होतो.
पुढे गश्मीर महाजनी म्हणाला की, “मी खूप दारू प्यायचो. दिवसभर दारू प्यायचो. मी स्वत:ला सहा महिने एका रूममध्ये कोंडून घेतलं होतं. मी बाहेर जायचो नाही. मी कोणाचे फोन उचलायचो नाही.