Apurva Kulkarni
प्रसिद्ध गायक अनुव जैन याने लग्न करुन चाहत्यांना धक्का दिला आहे. अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये असलेल्या गर्लफ्रेंडसोबत त्याने लग्न केलं आहे.
अनुवने फोटो शेअर करत 'कैसे आई दो दिलों की ये बारात है' असं छान कॅप्शन दिलेलं आहे.
गेल्या अनेक वर्षापासून अनुव जैन हृदी नारंगसोबत रिलेशनशिपमध्ये होता.
अचनाक लग्नाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत त्याने चाहत्यांना आनंदाचा धक्काच दिला आहे.
अनुव शेरवानीमध्ये एकदम हटके दिसत आहे. तर हृधी सुद्धा लाल रंगाच्या घागऱ्यात उठून दिसत आहे.
या सगळ्या पोटोमध्ये अनुवच्या मेहंदीकडे सर्वांचं लक्ष जात आहे. हटके अंदाजात त्याने मेहंदी काढली आहे.
सोशल मीडियावर त्याचे फोटो व्हायलर होत आहेत. तसंच चाहते त्याच्यावर शुभेच्छाचा वर्षाव करत आहेत.