संतोष कानडे
येसूबाई दाभोळ प्रांतातील शिर्के घराण्यातील होत्या. त्यांचे वडील पिलाजीराव शिर्के स्वराज्यात दाखल झाले आणि मराठा साम्राज्याचा भाग बनले.
शिवाजी महाराजांनी संभाजीराजांसाठी येसूबाईंना निवडले. त्यांच्यातील कणखरपणा आणि शौर्य महाराजांनी ओळखले होते.
१६६५ मध्ये येसूबाईंचा विवाह संभाजी महाराजांसोबत झाला. त्या केवळ पाच-सहा वर्षांच्या होत्या.
शिवरायांनी येसूबाईंवर वडिलांसारखी माया केली. जिजाऊसाहेबांच्या सहवासामुळे त्यांच्यात नेतृत्वगुण विकसित झाले.
स्वराज्यासाठीच्या संघर्षात येसूबाईंनी अनेक संकटे झेलली. त्यांनी कधी स्वराज्यासाठी धैर्याने निर्णय घेतले, तर कधी सहनशीलतेचा मोठा आदर्श घालून दिला.
१६६६ मध्ये शिवराय आणि संभाजी आग्र्यात गेले. सुटकेसाठी महाराजांनी संभाजी राजे मृत झाल्याची अफवा पसरवली, त्यामुळे येसूबाईंना काही काळ विधवेचे सोंग आणावे लागले.
त्या वेळी येसूबाई खूप लहान होत्या, पण नऊ वर्षांच्या पतीच्या मृत्यूच्या अफवेला धैर्याने सामोऱ्या गेल्या.
अखेर संभाजी राजे परतले, पण या घटनेने येसूबाईंना मानसिक बळ दिले आणि पुढील संघर्षांसाठी तयार केले.