सकाळ डिजिटल टीम
अॅपल लवकरच त्यांचा पहिला फोल्डेबल आयफोन लाँच करू शकतो.
सुरुवातीच्या उत्पादनात फोल्डेबल आयफोनच्या फक्त ३-५ दशलक्ष युनिट्सची शिपमेंट होईल.
याची किंमत अंदाजे $२,००० ते $२,५०० (सुमारे १ लाख ७४ हजार ते २ लाख १७ हजार रुपये) असू शकते.
२०२५ च्या अखेरीस उत्पादन सुरू होईल आणि २०२६ मध्ये लाँच होण्याची अपेक्षा आहे.
२०२७ मध्ये सेकंड-जनरेशन फोल्डेबल iPhone लाँच होण्याची अपेक्षा असून, त्याच्या शिपमेंटची संख्या २० दशलक्ष युनिट्सपर्यंत पोहोचू शकते.
हा फोन ७.८ इंचाचा क्रीज-फ्री डिस्प्ले आणि ५.५ इंचाचा कव्हर डिस्प्ले असणार आहे, ज्यामुळे एक नवीन अनुभव मिळेल.
फोल्डेबल आयफोनमध्ये टायटॅनियम अलॉय बॉडी असणार आहे, जो मजबूत आणि आकर्षक असेल.
अॅपल फोल्डेबल आयफोनमध्ये टच आयडी परत आणू शकतो, साइड बटणावर असू शकतो. फेस आयडी असणे कठीण असल्यामुळे टच आयडीचा समावेश होण्याची शक्यता आहे.