शरीरात तयार होऊ शकतो 'विषारी वायू'! सफरचंदाच्या बियांचे धोके आणि गैरसमज

सकाळ डिजिटल टीम

फळांच्या बिया

अनेक फळांच्या बियांचे फायदे आपण एकले आहेत. त्यातच तुम्ही सफरचंदाच्या बियांचे देखील काही फायदे एकले असतील पण हे खरच फायदेशीर आहे की घातक जाणून घ्या.

Apple Seeds

|

sakal 

अमिग्डालिनची उपस्थिती

सफरचंदाच्या बियांमध्ये अमिग्डालिन (Amygdalin) नावाचा एक नैसर्गिक विषारी घटक असतो. बदाम, जर्दाळू आणि चेरीच्या बियांमध्येही हा घटक आढळतो.

Apple Seeds

|

sakal 

सायनाईडची निर्मिती

जेव्हा बिया चावून खाल्ल्या जातात किंवा व्यवस्थित पचतात, तेव्हा शरीरातील पचनक्रियेदरम्यान अमिग्डालिनचे विघटन होऊन त्यातून विषारी सायनाईड (Cyanide) वायू (हायड्रोजन सायनाईड) तयार होतो.

Apple Seeds

|

sakal 

विषारी वायूचा परिणाम

सायनाईड हा अत्यंत विषारी पदार्थ आहे. तो शरीरातील पेशींना ऑक्सिजनचा वापर करण्यापासून रोखतो, ज्यामुळे श्वास घेण्यास अडथळा निर्माण होतो आणि पेशी मृत होऊ लागतात.

Apple Seeds

|

sakal 

धोका

एखादी किंवा दोन अख्ख्या बिया अपघाताने गिळल्यास, पोटातील ऍसिड त्यांच्यावर लगेच प्रक्रिया करू शकत नाही आणि त्या तशाच शरीराबाहेर फेकल्या जातात, त्यामुळे लगेच धोका निर्माण होत नाही.

Apple Seeds

|

sakal 

विषबाधा

मोठ्या प्रमाणात बिया (उदाहरणार्थ, एका सफरचंदाच्या बिया) चावून खाल्ल्यास किंवा बारीक करून पावडर स्वरूपात घेतल्यास, विषबाधा (Poisoning) होऊ शकते.

Apple Seeds

|

sakal 

विषबाधेची लक्षणे

सायनाईड विषबाधेच्या लक्षणांमध्ये डोकेदुखी, चक्कर येणे, मळमळ, उलट्या, ओटीपोटात दुखणे आणि जलद श्वासोच्छ्वास यांचा समावेश होतो. गंभीर प्रकरणांमध्ये यामुळे कोमा किंवा मृत्यू देखील होऊ शकतो.

Apple Seeds

|

sakal 

आयुर्वेदिक गैरसमज

सफरचंदाच्या बियांचे कोणतेही स्पष्ट किंवा मान्यताप्राप्त आयुर्वेदिक फायदे नाहीत. सायनाईडच्या धोक्यामुळे आयुर्वेदिक तज्ज्ञही सहसा त्या खाण्याची शिफारस करत नाहीत.

Apple Seeds

|

sakal 

सुरक्षित सेवन

सफरचंद खाताना फक्त फळाचा भाग खावा. बिया असलेला मध्यभाग कापून टाकणे किंवा काळजीपूर्वक काढून टाकणे हा सर्वात सुरक्षित मार्ग आहे.

Apple Seeds

|

sakal 

भेसळयुक्त अन् इंजेक्टेड स्ट्रॉबेरी कशी ओळखाल? या सोप्या टेस्ट नक्की करा

Adulterated Strawberries

|

Sakal

येथे क्लिक करा