'भिजलेला आयफोन कृपया तांदळात नका टाकू..'; कंपनीचं आवाहन

Sudesh

आयफोन

अ‍ॅपल कंपनीचे आयफोन हे जेवढे फीचरफुल असतात, तेवढेच ते महाग देखील असतात.

iPhone in Rice | eSakal

पाणी

हे आयफोन पाण्यात पडून खराब होऊ नयेत यासाठी यूजर्स नेहमीच प्रयत्नशील असतात.

iPhone in Rice | eSakal

तांदूळ

मोबाईल पाण्यात पडल्यानंतर कित्येक लोक तो वाळावा यासाठी तांदळात ठेवतात.

iPhone in Rice | eSakal

सर्वमान्य

तांदूळ या मोबाईल किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तूमधील पाणी (आद्रता) शोषूण घेतो, यामुळे हा उपाय सर्वमान्य आहे.

iPhone in Rice | eSakal

इशारा

मात्र, अ‍ॅपलने आता आपल्या ग्राहकांना असं न करण्याचा इशारा दिला आहे. सोबतच, फोन वाळवण्यासाठी हेअर ड्रायरचा वापर करू नये असंही कंपनीने म्हटलं आहे.

iPhone in Rice | eSakal

धोका

भिजलेला आयफोन तांदळात ठेवल्यामुळे तांदळाचे लहान लहान कण फोनमध्ये शिरू शकतात असं कंपनीने म्हटलं आहे. यामुळे फोन अधिक खराब होण्याचा धोका आहे.

iPhone in Rice | eSakal

उपाय

कंपनीने सांगितलं, की आयफोनमधील पाणी बाहेर काढण्यासाठी, कनेक्टर खालच्या बाजूला असेल अशा स्थितीत तो फोन हळू-हळू आपल्या हातावर आपटा.

iPhone in Rice | eSakal

उपाय

यानंतर फोन कोरड्या भागात ठेवून द्यावा आणि 30 मिनिटांनी चार्जिंगला लावावा असंही कंपनीने सांगितलं. यानंतर सुमारे 24 तासांमध्ये फोन पूर्णपणे वाळेल, असं अ‍ॅपलने स्पष्ट केलं.

iPhone in Rice | eSakal
iPhone 15 Making cost | eSakal