'आयफोन 15' सीरीजचे फोन बनवण्यासाठी कंपनीला किती येतो खर्च?

Sudesh

आयफोन 15

अ‍ॅपलने काही दिवसांपूर्वीच आपली नवीन आयफोन 15 सीरीज लाँच केली आहे. यामध्ये चार वेगवेगळे मॉडेल लाँच करण्यात आले आहेत.

iPhone 15 Making cost | eSakal

किंमत

आयफोन सीरीजमधील बेस मॉडेलची किंमत 79,999 रुपयांपासून सुरू होते आहे. तर टॉप मॉडेलची किंमत तब्बल 2 लाख रुपयांपर्यंत जात आहे.

iPhone 15 Making cost | eSakal

फीचर्स

नवीन आयफोन सीरीजमध्ये अद्ययावत फीचर्स, अपग्रेडेड कॅमेरा, नवीन चिप आणि यूएसबी सी-टाईप चार्जिंग पोर्ट देण्यात आलं आहे.

iPhone 15 Making cost | eSakal

कंपनीचा खर्च

आयफोन पहिल्यापासूनच आपल्या महागड्या किंमतींसाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे एक आयफोन तयार करण्यासाठी कंपनीला नेमका किती खर्च येतो याबाबत लोकांना कुतूहल असतं.

iPhone 15 Making cost | eSakal

14 सीरीजशी तुलना

आयफोनच्या 15 सीरीजमधील फोन बनवण्यासाठी 14 सीरीजच्या तुलनेत 12 टक्के अधिक खर्च आल्याचं रिपोर्टमध्ये समोर आलं आहे. डिस्प्ले, चिप आणि फ्रेम या गोष्टींमुळे हा खर्च वाढला आहे.

iPhone 15 Making cost | eSakal

iPhone 15

अ‍ॅपल आयफोन 15 हे बेस मॉडेल बनवण्यासाठी कंपनीला सुमारे 423 डॉलर्स, म्हणजेच साधारणपणे 35,200 रुपयांचा खर्च येतो. याची किंमत सुमारे 80 हजार रुपये आहे.

iPhone 15 Making cost | eSakal

iPhone 15 Plus

आयफोन 15 प्लस हे मॉडेल बनवण्यासाठी कंपनीला सुमारे 442 डॉलर्स, म्हणजेच साधारपणे 36,800 रुपये खर्च येतो.

iPhone 15 Making cost | eSakal

iPhone 15 Pro

आयफोन 15 प्रो या मॉडेलला बनवण्यासाठी कंपनीला साधारपणे 523 डॉलर्स, म्हणजेच सुमारे 43,500 रुपयांचा खर्च येतो. याची विक्री किंमत सुमारे दीड लाख रुपये आहे.

iPhone 15 Making cost | eSakal

iPhone 15 Pro Max

आयफोन 15 प्रो मॅक्स या मॉडेलला बनवण्यासाठी सुमारे 558 डॉलर्स एवढा खर्च येतो. म्हणजेच, सुमारे दोन लाख रुपयांना विक्री होत असलेला हा फोन बनवण्यासाठी कंपनीला 46,447 रुपये खर्च करावे लागतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iPhone 15 Making cost | eSakal