Monika Shinde
कडाक्याच्या उन्हात जास्त वेळ राहिल्यास त्वचा टॅन होऊ लागते. यापासून बचाव किंवा सुटका मिळवण्यासाठी लोक विविध उपाय करतात.
अनेक वेळा चेहऱ्याच्या सौंदर्यासाठी हजारो रुपये खर्च केले जातात, परंतु याचा फायदा होईलच असं नसतं. म्हणून, घरच्या घरी नैसर्गिक पद्धतीने तुम्ही कॉफी मास्कचा वापर करून चेहऱ्याचे सौंदर्य वाढवू शकता.
कॉफी मास्क तयार करण्यासाठी, २ चमचे कॉफी पावडर, १ चमचा दही आणि १ चमचा कोरफड जेल घ्या. सर्व घटक एकत्र करा आणि त्याचे पेस्ट तयार करा
पहिल्यांदा चेहरा स्वच्छ धुऊन घ्या. त्यानंतर तयार केलेली कॉफी मास्क पेस्ट हलक्या हाताने चेहऱ्यावर लावा. १५-२० मिनिटे ठेवा, नंतर कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ करा.
कॉफी मास्क त्वचेवर मॉइश्चरायझेशन वाढवतो आणि त्वचेला चमकदार बनवते. चेहऱ्यावरील डाग कमी होतात.