सकाळ डिजिटल टीम
निरोगी आणि चमकदार केस कोणाला नको असतात? महिलांना सुंदर आणि जाड केस हवेच असतात.
आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत लोकांना स्वतःसाठी वेळच नाही.
शरीरातील पोषक तत्वांचा अभाव, केसांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम करतो.
केसांच्या आरोग्यासाठी, बाहेरून पोषण देणे आणि आंतरिक काळजी घेणे अत्यंत महत्वाचे आहे.
आयुर्वेदात केसांच्या सर्व समस्यांसाठी स्पष्ट उपाय दिले आहेत.
केसांची मजबूतीसाठी आवळा, शिकाकाई, रीठा आणि भृंगराज यांची पावडर बनवा.
लोखंडी पॅनमध्ये पाण्यासोबत पावडर शिजवून पेस्ट बनवा.
ही पेस्ट केसांना लावा आणि काही वेळाने शॅम्पूशिवाय धुवा.
ही पद्धत वापरून केसांच्या हळूहळू सर्व समस्यांपासून मुक्तता मिळवा.