Yashwant Kshirsagar
साताऱ्याजवळचं ‘अपशिंगे मिलिटरी’ हे गाव फक्त नावापुरतं नाही, तर खरंच 'मिलीटरी'चा अभिमान बाळगणारं गाव आहे.
साताऱ्यापासून १८ किमीवर असलेल्या या गावात शिरताना ‘ग्रामपंचायत अपशिंगे मिलीटरी’ अशी कमान आपल्या स्वागतासाठी उभी आहे.
गावात जवळपास ८५० कुटुंबं असून त्यातील बहुतांश घरांतून एक तरी व्यक्ती सैन्यात आहे.
आजही गावातील ४५० हून अधिक तरुण विविध रेजिमेंटमध्ये कार्यरत आहेत, तर ८०० पेक्षा जास्त माजी सैनिक आहेत.
गावात शहीद झालेल्या जवानांचं स्मारक उभं करण्यात आलं आहे. त्यावर वीरपत्नींची नावंही आहेत.
१९६२ च्या युद्धात हिंदुराव पाटील आणि त्यांचे वडील दोघंही चीनच्या ताब्यात गेले होते. वडील परतले नाहीत, पण हिंदुराव २ वर्षांनी परतले.
पुलवामा हल्ल्यानंतर गावात भीती आणि संतापाचे वातावरण होते. कारण गावातील ४० जवान सीआरपीएफमध्ये आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज विद्यालयात लहानपणीच परेड, ड्रिल यांचं प्रशिक्षण दिलं जातं – हीच सैन्याची पहिली पायरी.
पहिल्या महायुद्धात गावातील ४६ जवानांनी बलिदान दिलं. म्हणून ब्रिटिशांनी ‘मिलीटरी’ ही उपाधी गावाला बहाल केली.
आजही गावाची चौथी पिढी सैन्यात कार्यरत आहे. अपशिंगे हे गाव म्हणजे खरं तर देशसेवेचं जिवंत उदाहरण आहे.