एका निर्णयाने अख्खा समुद्र ५० वर्षात आटला; उरलं केवळ नाव आणि वाळूत जहाजांचे अवशेष

सकाळ डिजिटल टीम

तापमान वाढ

जागतिक तापमानवाढ हा सध्या जगभरात चिंतेचा विषय आहे. जागतिक सरासरीपेक्षा जास्त तापमानाची नोंद अनेकदा झालीय. याच जागतिक तापमान वाढीने आणि मानवाने घेतलेल्या निर्णयाने अख्खा समुद्रच आटलाय.

Aral Sea

|

Esakal

समुद्र फक्त नावाला

एकेकाळी उंच लाटा आणि भली मोठी जहाजं वाहून नेणारा समुद्र फक्त ५० वर्षात कोरडाठक पडला. कजाकिस्तान आणि उज्बेकिस्तान यांच्या मधे असलेला अरल समुद्र आज फक्त नावाला उरला आहे.

Aral Sea

|

Esakal

सोविएतचा प्रकल्प

जगातला सर्वात मोठा इनलँड वॉटर बॉडी असणारा ६८ हजार चौरस किमी क्षेत्रात हा समुद्र पसरला होता. १९६० च्या दशतका सोविएत जलसिंचन प्रकल्पामुळे हा समुद्र आटायला सुरुवात झाली.

Aral Sea

|

Esakal

जलसिंचन

१९६० च्या दशकात सोविएत संघाने जलसंचिनासाठी कझाकिस्तान, उझबेकिस्तान, तुर्कमेनिस्तानमध्ये कोरड्या मैदानावर पाणी वळवण्याचा प्रकल्प सुरू केला.

Aral Sea

|

Esakal

पाणी वळवलं

उजबेकिस्तानमधील सिर दार्या आणि अमू दार्या या नद्यांचं पाणी वळवण्यात आलं होतं. यामुळे अरल समुद्रात या नद्यांचं जाणारं पाणी बंद झालं.

Aral Sea

|

Esakal

समुद्र आटला

नद्यांचं पाणी वळवल्यानं सिंचन क्षेत्र वाढलं पण समुद्र कोरडा पडला. अडीचशे ते तीनशे किलोमीटरपर्यंत पसरलेला समुद्र यानंतर आटायला सुरुवात झाली.

Aral Sea

|

Esakal

वाचवण्याची धडपड

समुद्र आटायला सुरू होताच कझाकिस्तानने अरल समुद्राच्या उत्तर आणि दक्षिण भागाच्या मधे एक धरण बांधलं. पण समुद्र पुन्हा त्या स्थितीत येणं शक्य झालं नाही.

Aral Sea

|

Esakal

वाळवंट

१९६० ते २०१० या अवघ्या ५० वर्षातच समुद्र कोरडा पडला. त्यात अनेक ठिकाणी जहाजांचे अवशेष आणि दूरवर पसरलेली वाळू दिसते.

Aral Sea

|

Esakal

हॉल्ट ते टर्मिनसपर्यंत; भारतामध्ये किती प्रकारची रेल्वे स्थानके आहेत? जाणून घ्या

Terminus | Sakal
इथं क्लिक करा