Anuradha Vipat
अदिती राव हैदरी आणि सिद्धार्थने सप्टेंबर महिन्यात लग्न केल.
आता त्यांनी राजस्थानमध्ये दुसऱ्यांदा लग्न केल्याची माहिती समोर आली आहे.
त्यांच्या या विवाहसोहळ्याचे फोटो सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.
अदिती राव हैदरीने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर दुसऱ्या लग्नाचे फोटो शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये अदितीने लाल रंगाचा लेहंगा परिधान केल्याचे दिसत आहे.
तसेच या फोटोंमध्ये सिद्धार्थने मोती रंगाची शेरवानी घातलेली दिसत आहे.
सोशल मीडियावर अदिती आणि सिद्धार्थच्या दुसऱ्या लग्नातील हे फोटो तुफान व्हायरल झाले आहेत.