उन्हामुळे डोळ्यांची जळजळ होतेय? नेत्रतज्ज्ञांनी सांगितल्या 'या' टिप्स!

Aarti Badade

उन्हाचा नाजूक डोळ्यांवर परिणाम

डोळे हे शरीराचा अतिशय नाजूक अवयव असून वाढत्या तापमानामुळे डोळ्यांची जळजळ होणे, लाल होणे किंवा पाणी येणे अशा समस्या उद्भवतात.

Summer Eye Care

|

Sakal

डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय आयड्रॉप नको!

बाजारात अनेक प्रकारचे आयड्रॉप उपलब्ध आहेत, त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय स्वतःहून कोणताही ड्रॉप वापरल्यास डोळ्यांवर विपरीत परिणाम होऊ शकतो.

Summer Eye Care

|

Sakal

सनग्लासेस आणि टोपीचा वापर करा

उन्हात बाहेर जाताना अतिनील किरणांपासून (UV Protection) बचाव करण्यासाठी दर्जेदार सनग्लासेस आणि डोक्यावर टोपी किंवा कॅप घालणे आवश्यक आहे.

Summer Eye Care

|

Sakal

डोळ्यांना वारंवार स्पर्श करणे टाळा

डोळ्यांना सतत हात लावणे किंवा चोळणे टाळावे; तसेच डोळ्यात धूळ गेल्यास हात न लावता स्वच्छ पाण्याने डोळे धुवावेत.

Summer Eye Care

|

Sakal

शरीर आणि डोळे हायड्रेट ठेवा

उन्हाळ्यात शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्यावे, तसेच एसी किंवा पंख्याच्या थेट हवेत तासनतास बसणे टाळावे.

Summer Eye Care

|

Sakal

गॅजेट्सचा वापर कमी करा

मोबाईल आणि लॅपटॉपचा सततचा वापर कमी करून डोळ्यांना पुरेशी विश्रांती देणे गरजेचे आहे.

Summer Eye Care

|

Sakal

'या' लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

जर डोळे जास्त लाल झाले असतील, जळजळ वाढली असेल किंवा धुसर दिसत असेल, तर घरगुती उपाय करण्याऐवजी तात्काळ नेत्रतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Summer Eye Care

|

Sakal

गाव छोटं पण काम लय मोठं! महाराष्ट्रातील 'या' ठिकाणांचा डंका सातासमुद्रापार

Famous villages of Maharashtra

|

sakal

येथे क्लिक करा