Monika Shinde
लोकप्रिय गायक अरिजीत सिंगने अचानक प्लेबॅक गायकीतून निवृत्ती घेण्याचा निर्णय जाहीर केला. त्यांच्या या निर्णयाने अनेक चाहते धक्क्यात आले आहेत. काही निराश झाले असले, तरी काहीजण त्यांच्या निर्णयाची प्रशंसा करत आहेत.
Arijit Singh statement
esakal
अरिजीतने ‘फिर मोहब्बत करने चला’ या गाण्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले, जे सुपरहिट ठरले. निवृत्ती घेण्यापूर्वीच त्यांचे नवीन गाणं 'मातृभूमी' रिलीज झाले, जे त्यांनी सलमानसाठी गायले आहे.
Arijit Singh statement
esakal
अरिजीतने सांगितले की, त्यांचा वास्तविक आवाज लोकांना नेहमी आवडत नव्हता. त्यांचं ओरिजनल आवाज लोकांना वेगळा वाटायचा, आणि म्हणून त्यांना त्यावर काम करावं लागलं.
Arijit Singh statement
esakal
त्यांनी सांगितले, “लोकांच्या अपेक्षांनुसार मला माझा आवाज बदलावा लागला. मूळ आवाजात परत येण्यासाठी काही महिन्यांचा कठीण परिश्रम लागला.”
Arijit Singh statement
esakal
अरिजीत म्हणाले, “मी स्वतःला खूप त्रास दिला, जेणेकरून माझा आवाज लोकांना वेगळ्या आणि आकर्षक प्रकारे ऐकू येईल.”
Arijit Singh statement
esakal
“लोक माझ्या मूळ आवाजावर नाराज होते. जेव्हा मी त्या स्वरात गातो, तेव्हा त्यांना तो गोड किंवा आकर्षक वाटत नसे,” असे अरिजीतने स्पष्ट केले.
Arijit Singh statement
esakal
अरिजीतने सांगितले, “असंच नाही की काहीही गाऊन ऑटो-ट्यून लावलं की गाणं परिपूर्ण होईल. गाण्यात भावनांचा समावेश असणे अत्यावश्यक आहे.”
Arijit Singh statement
esakal
“जेव्हा गायक गातो, तेव्हा तो भावनांसह गातो. त्यामुळे गाणं कधीही पूर्णपणे परफेक्ट होत नाही,” त्यांनी सांगितले.
Arijit Singh statement
esakal
“गाण्यात जास्तीत जास्त नैसर्गिक भावनांचा समावेश ठेवण्यासाठी ऑटो-ट्यूनर वापरावा लागतो. तेही संतुलित प्रमाणात,” अरिजीतने नमूद केले.
Arijit Singh statement
esakal