Anuradha Vipat
अर्जुन कपूर त्याच्या अभिनयापेक्षाही त्याच्या खाजगी आयुष्याबद्दल नेहमी चर्चेत असतो.
आता एका मुलाखतीत अर्जुनने त्याच्या खास व्यक्तीची आठवण काढत भावूक होताना दिसला आहे
अर्जुन कपूरची आई मोना यांचं निधन होऊन बराच काळ लोटला आहे. पण आजही तो क्षण अर्जुन कपूरसाठी खूप भावनात्मक आहे.
आईच्या निधनानंतर अर्जुनने स्वत: ला कसं सांभाळलं याविषयी तो अगदी मोकळेपणाने बोलला आहे
अर्जुन म्हणाला, तो काळ खूप कठीण होता. माझा भूतकाळ फार वाईट आहे, त्यात खूप ट्रॉमा आहे.
अर्जुन म्हणाला, मला या गोष्टीचं आश्चर्य वाटतं की लोकांना असं का वाटतं की आम्हाला कोणत्याही परिस्थितीतून बाहेर पडणं हे सोपं असतं किंवा होतं.
अर्जुन म्हणाला, आउटसाइडर्ससाठी या क्षेत्रात येऊन करिअर करणं किती कठीण असतं. जे आयुष्य मी जगतोय ते जगणं माझ्यासाठी फार सोपं नव्हत