सकाळ वृत्तसेवा
बॉलीवूडचा बादशहा शाहरुख खान आता आपल्या मुलाला लाँच करत आहे. आर्यन खान आपल्या पहिल्या वेब सीरीज 'बॅड्स ऑफ बॉलिवूड’ मधून डायरेक्शनची सुरुवात करत आहे.
२ मिनिटं ३७ सेकंदांचा प्रीव्यू आला ज्यात अनेक स्टार्स एकत्र दिसले. या खास प्रसंगी खान कुटुंबाने एक भव्य इव्हेंट आयोजित केला.
प्रीव्यू इव्हेंटमध्ये आर्यनने जेव्हा बोलायला सुरुवात केली, तो क्षण शाहरुखसाठी सर्वात प्राउड मोमेंट ठरला.
आर्यनने सांगितले की ही सीरीज तयार होण्यासाठी ४ वर्षांची मेहनत, हजारो टेक्स आणि असंख्य चर्चासत्रे झाली आहेत.
आर्यन म्हणतो, “या शोचा एकच उद्देश होता – खूप लोकांपर्यंत, खूप ठिकाणी, एंटरटेनमेंट पोहोचवणे.”
या प्रोजेक्टला गौरी खानने प्रोड्युस केले असून, Red Chillies Entertainment व T-Series या मोठ्या बॅनर्ससोबत जोडले गेले आहेत.
शाहरुखने सांगितले – “बॉबी देओल एकदा फोन करून म्हणाला, आर्यन खूप टेक घेतो, याला काहीतरी सांग ना!” यावर प्रेक्षक हसले.
या पहिल्या प्रोजेक्टवर कोट्यवधी रुपये खर्च झाले आहेत. मात्र नेमकी रक्कम अद्याप जाहीर झालेली नाही.
आर्यनचा जन्म १९९७ मध्ये झाला असून तो सध्या २७ वर्षांचा आहे. लोक त्याला अभिनेता म्हणून पाहू इच्छित होते, पण त्याने दिग्दर्शनाची वेगळी वाट निवडली आहे.