Mayur Ratnaparkhe
दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघ निवडणुकीनंतर अभाविपचा आर्यन मान हा नवा अध्यक्ष बनला आहे.
आर्यन मानच्या प्रचारासाठी रेंज रोव्हर सारख्या अलीशान गाड्यांचाही वापर झाला होता.
एवढंच नाहीतर संजय दत्त, सोनू सूद, रणदीप हुडा हे बॉलिवूड स्टारही प्रचारासाठी आले होते.
आर्यन मान हा मूळचा हरियाणातील बहादूरगड येथील रहिवासी आहे.
आर्यन मान हा राष्ट्रीय स्तरावरील फुटबॉल खेळाडू देखील आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, आर्यन मानचे वडील सिकंदर मान हे बेरी येथील एडीएस ग्रुपचे कार्यकारी संचालक आहेत.
आर्यन मान याने बहादूरगड येथील सेंट थॉमस शाळेत प्राथमिक शिक्षण घेतले आहे.
आर्यन मान उच्च शिक्षणासाठी दिल्लीत आला होता. क्रीडा कोट्यातून दिल्ली विद्यापीठात प्रवेश मिळालेला आहे.
सध्या आर्यन मान दिल्ली विद्यापीठातून ग्रंथालय विज्ञानमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेत आहे.