Monika Shinde
हा किडा दिसायला साधा पण त्याची किंमत ऐकून तुम्हाला धक्का बसेल! जगातील सर्वात महागड्या किड्यांमध्ये तो मोजला जातो.
हा स्टॅग बीटलचा एक प्रकार असून तो मुख्यतः आशियात आढळतो. याच्या जबड्याच्या अनोख्या रचनेमुळे तो खूप आकर्षक दिसतो.
स्टॅग बीटलच्या काही प्रजाती काळ्या बाजारात तब्बल ७५ लाखांपर्यंत विकल्या जातात. ही किंमत ऐकून नक्कीच धक्का बसेल
हा किडा मुख्यतः आशिया, युरोप आणि अमेरिकेतील उष्णकटिबंधीय जंगलांमध्ये आढळतो. भारतातही त्याचे काही प्रकार आढळतात.
ब्रिटन आणि इतर अनेक देशांत या किड्यांची विक्री पूर्णपणे बंद आहे. भारतातही तो वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत संरक्षित आहे.
जपानमध्ये या किड्यांना प्रतिष्ठेचे प्रतीक मानले जाते. येथे बीटल फाइटिंगसाठीही स्पर्धा भरवली जातात.
प्रजनन कठीण असल्यामुळे हा किडा दुर्मीळ आहे. अळी अवस्थेत तो २-५ वर्षे राहतो पण प्रौढ झाल्यावर आयुष्य फक्त काही महिने असते.
पर्यावरणासाठी हा किडा उपयुक्त आहे कारण तो कुजलेल्या लाकडावर राहून जंगलातील पोषक तत्त्व पुन्हा वापरायला मदत करतो.