Aarti Badade
मराठी भाषेत अनेक म्हणी आहेत, ज्या कमी शब्दांत आयुष्यातील मोठा अनुभव सांगून जातात.
Marathi Proverbs meaning
Sakal
अशीच एक म्हण म्हणजे 'असतील शिते तर जमतील भुते!' पण या म्हणीचा नेमका अर्थ काय आहे?
Marathi Proverbs meaning
Sakal
एखाद्या व्यक्तीकडे पैसा, संपत्ती किंवा इतरांना फायदा होईल अशी गोष्ट असेल, तर तिच्याभोवती अनेक माणसे गोळा होतात, असा या म्हणीचा अर्थ आहे.
Marathi Proverbs meaning
Sakal
या म्हणीतील 'शिते' म्हणजे अन्नाचे कण किंवा उरलेले अन्न. येथे शिते हे लाभाचे प्रतीक मानले जाते. जिथे काही मिळण्याची शक्यता असते, तिथे लोक आपोआप आकर्षित होतात.
Marathi Proverbs meaning
Sakal
एखाद्या व्यक्तीकडे पैसा, सत्ता किंवा प्रतिष्ठा असेल, तर अनेक जण तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करतात. मात्र, या जवळिकीमागे कधी कधी स्वार्थ दडलेला असू शकतो.
Marathi Proverbs meaning
Sakal
जोपर्यंत एखाद्या व्यक्तीकडून फायदा मिळतो, तोपर्यंत काही लोक तिच्या आसपास असतात. मात्र, आर्थिक परिस्थिती बिघडली किंवा फायदा मिळणे बंद झाले की अशी माणसे दूर जातात.
Marathi Proverbs meaning
Sakal
आपल्या आयुष्यात कोण जवळ येत आहे, यापेक्षा कोण निस्वार्थपणे आपल्या सोबत उभे राहते, हे ओळखणे महत्त्वाचे आहे. संकटाच्या काळात साथ देणारी माणसेच खरी असतात.
Marathi Proverbs meaning
New Clothes wearing tips
Sakal