आषाढ स्पेशल! गावरान रस्सा अन् सुकं चिकनची पारंपरिक रेसिपी

Aarti Badade

लागणारे साहित्य

५०० ग्रॅम चिकन,३ मध्यम कांदे (बारीक चिरलेले),१½ चमचा आलं-लसूण पेस्ट,२-३ चमचे सुकं खोबरं,२-३ मोठे चमचे कांदा-लसूण मसाला,तमालपत्र, दालचिनी, लवंग, मिरी, जिरे,तेल, मीठ आणि कोथिंबीर

Gavran Chicken Rassa & Dry Chicken Recipe

|

Sakal

चिकन मॅरीनेट करा

चिकनला हळद, मीठ आणि आलं-लसूण पेस्ट लावून किमान १५ मिनिटे मॅरीनेट करून ठेवा.

Gavran Chicken Rassa & Dry Chicken Recipe

|

Sakal

मसाल्याचे वाटण तयार करा

कढईत सुकं खोबरं आणि कांदा छान भाजून घ्या. त्यानंतर ते मिक्सरमध्ये बारीक वाटून मसाल्याचे वाटण तयार करा.

Gavran Chicken Rassa & Dry Chicken Recipe

|

Sakal

मसाला परतून घ्या

तेल गरम करून खडे मसाले फोडणीला घाला. त्यात उरलेला कांदा, आलं-लसूण पेस्ट, कांदा-लसूण मसाला आणि तयार वाटण घालून तेल सुटेपर्यंत परता.

Gavran Chicken Rassa & Dry Chicken Recipe

|

Sakal

चिकन शिजवा

मॅरीनेट केलेले चिकन मसाल्यात घालून ५ ते १० मिनिटे वाफेवर शिजवा, जेणेकरून मसाल्याची चव चिकनमध्ये मुरेल.

Gavran Chicken Rassa & Dry Chicken Recipe

|

Sakal

रस्सा

रस्सासाठी गरम पाणी घालून चिकन पूर्ण शिजवा. सुकं चिकन बनवण्यासाठी दुसऱ्या कढईत तेल गरम करून कांदा टोमॅटो आल लसूण पेस्ट टाकून थोडे वाटण टाकून चांगले परतून घ्या.

Gavran Chicken Rassa & Dry Chicken Recipe

|

Sakal

सुकं चिकन

त्यात मसाले टाकून तेल सुटे पर्यन्त परता. मग त्यात रस्सातले पीस काढून कढईत टाका. त्यात थोडा रस्सा सुद्धा टाका त्याने चव चांगली येते. कोथिंबीर टाकून सर्व्ह करा.

Gavran Chicken Rassa & Dry Chicken Recipe

|

Sakal

गरमागरम चवीचा आनंद घ्या

आषाढ स्पेशल गावरान चिकन रस्सा आणि सुकं चिकन भाकरी, ज्वारीची भाकरी, तंदुरी रोटी किंवा गरम भातासोबत सर्व्ह करा. मसालेदार चवीमुळे हा पदार्थ प्रत्येक नॉनव्हेज प्रेमीला नक्की आवडेल.

Gavran Chicken Rassa & Dry Chicken Recipe

|

Sakal

दररोज महिनाभर ब्लॅक टी प्यायल्याने शरीरात काय बदल होतात?

Drinking Black Tea Daily Health Benefits and Side Effects

|

Sakal

येथे क्लिक करा