Yashwant Kshirsagar
आषाढी एकादशी उजाडली की, उपवास धरणाऱ्या वारकऱ्यांना वाघाटी (गोविंद फळ) हिरव्याकंच फळांचे वेध लागतात.
आषाढी एकादशीचा उपवास सोडताना दुसऱ्या दिवशी वाघाटी फळाची भाजी खाण्याची पूर्वापार प्रथा आहे. या फळाला आयुर्वेदात देखील खूप महत्त्व आहे.
वाघाटी क्षयरोगावर अत्यंत गुणकारी औषध आहे.
सर्दी, खोकला आणि कफ झाल्यास गोविंदफळ उपयुक्त आहे. ते घसादुखी आणि छातीत कफ झाल्यास आराम देण्यास मदत करते.
हे फळ उगाळून पाण्यासोबत प्यायल्यास पोटदुखीवर देखील इलाज होतो.
वाघाटी उष्ण आणि उत्तेजक असून पित्तनाशक आहे. वाघाटी फळ खाल्ल्यास पित्त कमी होते.
तीव्र डोकेदुखी आणि सायनसच्या समस्येवरही गोविंदफळ उपयोगी आहे.
गोविंदफळ पोटातील जंत मारण्यासाठी आणि पचनास मदत करण्यासाठी वापरले जाते.
सर्पदंशावर नैसर्गिक उतारा म्हणून देखील गोविंदफळाचा वापर केला जातो.
गोविंदफळ खाण्यापूर्वी किंवा वापरण्यापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घेणे आवश्यक आहे, कारण त्याचे काही दुष्परिणाम देखील असू शकतात.