पंढरीच्या वारीतील पादुका चक्क होडीने विठोबाच्या मंदिरात पोहचल्या होत्या..70 वर्षांपूर्वीचे 10 दुर्मिळ फोटो

Saisimran Ghashi

१९५६ ची आषाढी वारी आणि पूर

१९५६ सालची आषाढी वारी पंढरपूरच्या इतिहासात खूप महत्त्वाची ठरली. तेव्हा वारीला भीमा नदीच्या मोठ्या पुराचा सामना करावा लागला.

ashadhi wari 1956 old photos | esakal

भीमा नदीने घेतले रौद्र रूप

पुणे जिल्ह्यात खूप पाऊस झाला. त्यामुळे भीमा नदीला मोठा पूर आला. पाणी सोलापूर जिल्ह्यातील शेतात घुसले.

bheema river floods old photos | esakal

चंद्रभागेचा कधी न पाहिलेला उग्रपणा

चंद्रभागेच्या तिन्ही बाजूंनी पाणी शहरात शिरले. अनेक घरे, दुकाने वाहून गेली. हजारो कुटुंबे उद्ध्वस्त झाली.

chandrabhaga river flood photos | esakal

पंढरपूरचे जुने वाडे जमीनदोस्त

२५० वर्षांहून जुन्या वाड्यांचे मोठे नुकसान झाले. सुमारे ४०० ते ५०० घरे कोसळली.

pandharpur old places photos | esakal

मंदिरेही पाण्याखाली

पुंडलिक मंदिर सोडून, पंढरपूरची सर्व मंदिरे पाण्याखाली गेली. नामदेव पायरीलाही पाणी लागले.

pandharpur temple 1956 photos | esakal

वारी पोहोचली, पण शहरात नव्हे

संतांच्या पालख्या गावाबाहेरच थांबवण्यात आल्या. लाखो वारकरी शहराच्या वेशीबाहेरच थांबले.

pandharpur floods 1956 old photos | esakal

होडीने पंढरपूर प्रवास

वारीची परंपरा थांबू नये म्हणून, काही मानकरी होडीने पादुका घेऊन विठोबाच्या मंदिरात गेले, इतिहासात असे पहिल्यांदाच घडले.

vitthal paduka 1956 historical photos | esakal

भाविकांचे दूरूनच दर्शन

इतर सर्व भाविकांनी चंद्रभागेच्या पलीकडूनच विठोबाच्या कळसाचे दर्शन घेतले. त्यांची श्रद्धा मात्र कायम राहिली.

vitthal paduka darshan photos | esakal

अतोनात हानी

शेती पूर्णपणे उद्ध्वस्त झाली. व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. अनेक जनावरे मेली आणि काही माणसांनाही जीव गमवावा लागला

warkari historical photos | esakal

80 वर्षांपूर्वी पुणेकरांनी वारकऱ्यांचं स्वागत कसं केलं होतं? कधीच न पाहिलेले 10 फोटो, एकदा बघाच

pandharpur wari in pune 80 years old photos | esakal
येथे क्लिक करा