दुसऱ्या बाजीराव पेशव्याने तब्बल 11 वर्षे केली होती वारी, काय आहे विहिरीचा इतिहास ?

Pranali Kodre

वारीचा इतिहास आणि बाजीराव पेशव्यांची ‘वाखरी विहीर’

वारीतील रिंगण परंपरेत असलेल्या 'बाजीराव विहिरी'चे ऐतिहासिक महत्त्व खूप मोठे आहे.

Bajirao Vihir Pandharpur Wari | Sakal

वारीतील रिंगणाची परंपरा

ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यात वाखरी परिसरात चार ठिकाणी गोल रिंगण होते. यात बाजीराव विहीर खूप खास आहे.

Pandharpur Wari | Sakal

वाखरी – पालखीचा शेवटचा मुक्काम

वाखरी हे आळंदी ते पंढरपूर पालखी मार्गावरील शेवटचे गाव आहे. येथे उभे आणि गोल रिंगण खूप मोठ्या प्रमाणात होते.

Pandharpur Wari | Sakal

बाजीराव पेशव्यांनी बांधलेली विहीर

सुमारे २०० वर्षांपूर्वी दुसऱ्या बाजीराव पेशव्यांनी ही चिरेबंद दगडी आयताकृती विहीर वाखरीजवळ बांधली.

Bajirao Peshwa II | Sakal

११ वर्ष पालखी सोहळ्याची संगत

बाजीराव पेशवे स्वतः ११ वर्षे पालखी सोहळ्यात सहभागी झाले होते. त्यांनी वारकऱ्यांच्या सोयीसाठी ही विहीर बांधली.

Bajirao Peshwa II | Sakal

विठोबाच्या सेवा-विचारातून घेतलेले निर्णय

पेशव्यांनी सरदार खाजगीवाले यांच्याकडून १५ बिघे जमीन आणि विहीर विकत घेतली. ती त्यांनी विठोबा मंदिराला अर्पण केली.

Bajirao Vihir | Sakal

तुळस-फुलांची सेवा या विहिरीच्या पाण्यावर

विठोबाला रोज लागणाऱ्या तुळशी आणि फुलांची शेती या विहिरीच्या पाण्यावर व्हावी, अशी बाजीरावांची कल्पना होती.

Lord Vitthal | Sakal

जमिनीच्या बदल्यात दिले ४०० रुपये

या महत्त्वाच्या व्यवहारात पेशव्यांनी जमिनीसाठी आणि विहिरीसाठी स्वतंत्रपणे ४०० रुपये दिले होते.

Bajirao Peshwa II | Sakal

वारीतील महत्त्वाचे स्थळ – बाजीराव विहीर

वारीच्या मार्गावरील हे ऐतिहासिक ठिकाण आजही वारकऱ्यांच्या श्रद्धेचे केंद्र आहे.

Bajirao Vihir | Sakal

पंढरपूरची वारी किती वर्षांपासून सुरू? काय लिहिलंय १००० वर्षांपूर्वीच्या शिलालेखात

Pandharpur Wari | Sakal
येथे क्लिक करा