पंढरपूरची वारी किती वर्षांपासून सुरू? काय लिहिलंय १००० वर्षांपूर्वीच्या शिलालेखात

Pranali Kodre

पंढरपूरची वारी किती प्राचीन?

पंढरपूरची वारी किती जुनी आहे? शिलालेख काय सांगतात? १००० वर्षांपूर्वीचे उल्लेख आणि ऐतिहासिक पुरावे या वेबस्टोरीत वाचा.

Pandharpur Wari | Sakal

१२३७ सालचा पहिला उल्लेख

शके ११५९ (इ.स. १२३७) सालचा होयरसाळ राजाचा शिलालेख आहे. वारीचा पहिला लेखी पुरावा याच शिलालेखात सापडतो.

Pandharpur Wari | Sakal

कुठे आहे हा शिलालेख?

हा शिलालेख पंढरपूरच्या सोळा खांबी मंडपाच्या तुळईवर आहे. तो तिन्ही बाजूंनी लिहिलेला आहे. यात संस्कृत आणि कानडी भाषा वापरली आहे.

Pandharpur Wari | Sakal

वारीचा स्पष्ट उल्लेख

या शिलालेखाच्या ७१व्या ओळीत 'वारी'चा स्पष्ट उल्लेख आहे. हे वारीचे सर्वात प्राचीन लिखित दस्तऐवज आहे.

Pandharpur Wari | Sakal

पुंडलिक आणि विठ्ठल देवाचे उल्लेख

शिलालेखात पुंडलिक मुनी आणि विठ्ठल देव यांची नावे आहेत. हे पंढरीच्या पुरातन भक्ती परंपरेचा पुरावा आहे.

Pandharpur Wari | Sakal

दुसरा शिलालेख – ‘चौऱ्यांशीचा शिलालेख’

शके ११९५ (इ.स. १२७३) चा आणखी एक शिलालेख आहे. याला ‘चौऱ्यांशीचा शिलालेख’ म्हणतात. यात पंढरपूरसाठी 'फागनीपूर' आणि विठोबासाठी 'विठ्ठल' असा उल्लेख आहे.

Vittal | Sakal

यादव राजांचा संदर्भ

या शिलालेखात रामचंद्र यादव राजाचा उल्लेख आहे. त्यांना 'पांढरीफडमुख्य' अशी पदवी दिली आहे. देवालय बांधणीचा प्राचीन पुरावा

Pandharpur Wari | Sakal

१११० मधील आणखी एक शिलालेख

शके १११० मधील आणखी एक शिलालेख आहे. यात विठोबाचे मंदिर बांधल्याचा स्पष्ट उल्लेख आहे. मंदिर बांधणाऱ्यांची नावेही नमूद आहेत.

Pandharpur Wari | Sakal

इ.स. ५१६ चा ताम्रपट

शके ४३८ (इ.स. ५१६) च्या ताम्रपटात एक उल्लेख आहे. पंढरपूरचा उल्लेख 'पांडुरंगपल्ली' असा आहे. हा आजवरचा सर्वात प्राचीन पुरावा मानला जातो.

Pandharpur Wari | Sakal

नाशिकमधल्या 'या' छोट्या गावात राहतात छत्रपतींच्या भोसले घराण्याचे वंशज

Chhatrapati Shivaji Maharaj | Sakal
येथे क्लिक करा