Ashish Nehra: नेहराजी... नाम ही काफी

आशुतोष मसगौंडे

भारतीय क्रिकेट संघाचा माजी वेगवान गोलंदाज आशिष नेहरा आज त्याचा ४४ वा वाढदिवस साजरा करत आहे. त्यांचा जन्म 29 एप्रिल 1979 रोजी दिल्लीत झाला.

Ashish Nehra

2003 च्या विश्वचषकात नेहराने इंग्लंडविरुद्ध शानदार गोलंदाजी केली होती. डरबनमध्ये भारतीय संघ 250 धावांचा बचाव करत होता. या सामन्यात त्याने 10 षटकात 23 धावा देत सहा विकेट्स घेतल्या आणि भारताला 82 धावांनी विजय मिळवून दिला.

Ashish Nehra

श्रीलंका हा आशिष नेहराचा आवडता संघ होता. 2005 मध्ये इंडियन ऑइल कपच्या अंतिम सामन्यात त्याने या संघाविरुद्ध 59 धावांत सहा विकेट घेतल्या होत्या. विशेष म्हणजे त्याने हा पराक्रम कोलंबोमध्ये करून श्रीलंकेच्या संघाला घरच्या मैदानावर उद्ध्वस्त केले होते.

Ashish Nehra

2011 मध्ये विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचा भाग असलेला आशिष नेहरा सध्या आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सचा मुख्य प्रशिक्षक आहे.

Ashish Nehra

आशिष नेहराने भारताकडून 17 कसोटी, 120 एकदिवसीय आणि 27 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.

Ashish Nehra

नेहरा आयपीएलचा भागही होता. तो मुंबई इंडियन्स, दिल्ली डेअरडेव्हिल्स (आता दिल्ली कॅपिटल्स), पुणे वॉरियर्स, चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबादकडून खेळला आहे.

Ashish Nehra

आशिष नेहराने एकदा सांगितले होते की, त्याच्याकडे फक्त एक जोड शूज होती, जी तो रणजी ट्रॉफी सामन्यांमध्ये वापरत असे. त्यानंतर, 1999 मध्ये जेव्हा त्याने कसोटी पदार्पण केले तेव्हा त्याच्याकडे तोच बूट होता आणि तो परिधान करून त्याने पदार्पण कसोटी खेळली होती.

नेहराची अर्धी कारकिर्द दुखापतींशी झगडली. मात्र, नेहराचे वैशिष्टय़ असे की प्रत्येक वेळी तो जखमी झाला की त्याने दमदार पुनरागमन केले.

Ashish Nehra

'त्या' वाईट अनुभवाबद्दल प्रियाने स्पष्टच सांगितलं

Priya Bapat | esakal