सकाळ डिजिटल टीम
‘शार्क टँक इंडिया’मधून प्रसिद्ध झालेले अश्नीर ग्रोव्हर नेहमीच त्याच्या स्पष्टवक्तेपणामुळे चर्चेत राहतात.
बिग बॉस १८ च्या ‘वीकेंड का वार’ एपिसोडमध्ये सलमान खानने अश्नीरच्या काही नकारात्मक टिप्पण्यांची आठवण करून दिली होती.
एका कार्यक्रमात अश्नीरने सलमानवर निशाणा साधला, "फालतूचा पंगा घेऊन तुमचं कॉम्निटिशन वाढवलं."
अश्नीरच्या विधानावर सलमानचे चाहते त्याला सोशल मीडियावर ट्रोल करत आहेत.
उर्फी जावेदने अश्नीरच्या व्हिडिओवर टीका केली, तिने इंस्टाग्राम स्टोरीवर लिहिले, "हिंमत असेल, तर आता सलमानसमोर हे सर्व बोल."
अश्नीरने उर्फीच्या टीकेला उत्तर देत एक फोटो पोस्ट करत, "सोशल मीडियावर काही झाले आहे का?" असा सूचक प्रश्न विचारला.
आता या वादावर सलमान खानची प्रतिक्रिया काय असेल, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.