संतोष कानडे
स्वतःला 'कॉस्मोलॉजिस्ट' (विश्वशास्त्रज्ञ) आणि अंकशास्त्र तज्ज्ञ म्हणवून घेणाऱ्या अशोक खरातचे काळे कारनामे जगासमोर आले आहेत.
अशोक खरातकडे येणारे लोक हे श्रीमंत, हायप्रोफाईल आणि सेलिब्रिटी असायचे. त्यामुळे त्यांच्याकडून तो भरमसाठी शुल्क उकळायचा.
एका कुंडलीसाठी अशोक खरात हा ५० लाखांपर्यंत पैसे उकळायचा, अशी माहिती एसआयटीच्या तापसामधून पुढे आलेली आहे
खरात हा अंकशास्त्राचा (Numerology) आधार घेऊन नावाच्या स्पेलिंगमध्ये बदल सुचवायचा. बड्या राजकारण्यांना 'ग्रहांची भीती' घालून त्याने आपल्या जाळ्यात ओढले होते.
त्यामुळे अशोक खरातकडे २०० कोटींपेक्षा जास्तीची संपत्ती असल्याचं स्पष्ट झालं आहे. खरात आणि त्याच्या कुटुंबाच्या नावावर तब्बल ५२ सातबारे आहेत
अशोक खरातची पॉवर एवढी होती की, त्याच्या फार्महाऊससाठी ४० किलोमीटरवरून विशेष पाणी पुरवठा करण्यात आलेला होता.
या पाण्यासाठी मंत्रिमंडळाची विशेष बैठक बोलावण्यात आलेली होती, हे विशेष.
नाशिकच्या पाथर्डी गावात खरातची १५० कोटींची जमीन आहे. शिर्डी आणि सिन्नरमध्येही आलिशान फार्महाऊस आणि जमिनींचे तुकडे आहेत.
बड्या अधिकाऱ्यांच्या आणि नेत्यांच्या आशीर्वादाने खरातचे हे साम्राज्य उभे राहिल्याचं प्रथमदर्शनी स्पष्ट झालं आहे.